होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नाणार’विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे; मुख्यमंत्र्यांचे आदेश

‘नाणार’विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Last Updated: Dec 03 2019 1:16AM
मुंबई : प्रतिनिधी

आरे कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा मोठा निर्णय घेतला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश आज दिले. त्यामुळे नाणारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आज त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांनी आरे मेट्रो आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पुढे आली होती. त्यापार्श्‍वभूमीवर त्यांनी हे गुन्हे मागे घेतले आहेत.

दरम्यान, मार्च 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन संघर्ष समितीला दिले होते. मात्र, त्यानंतरही फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेतले नव्हते.