Wed, Sep 23, 2020 01:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमेरिकेला जाण्याचा किंवा येण्याचा बेत आहे का? बातमी आपल्यासाठी!

अमेरिकेला जाण्याचा किंवा येण्याचा बेत आहे का? बातमी आपल्यासाठी!

Last Updated: Jul 05 2020 8:23PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

वंदे भारत मिशन अंतर्गत राष्ट्रीय एअरलाईन्स कंपनी एअर इंडियाने ११ ते १९ जुलै दरम्यान अमेरिकेसाठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान एकूण ३६ विमाने चालवण्यात येतील. या विमानसेवेमुळे कोरोना महारोगराईमुळे अमेरिकेतच अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परतता येणार आहे. भारतात अडकून पडलेल्या अमेरिकन नागरिकांना सुद्धा त्यांच्या देशात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अधिक वाचा : कोरोना महामारीमुळे केरळने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

अमेरिकेसाठी चालवण्यात येणाऱ्या विमानसेवेसाठी तिकिट बुकिंग केवळ कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून अथवा कार्यालयामधून करता येईल. विमान तिकिट विक्री, उद्या सोमवारी उत्तररात्री २ वाजतापासून सुरु होणार असल्याचे एअर इंडिया कडून स्पष्ट करण्यात आले. अमेरिकतील वेळेप्रमाणे सकाळी साडे दहा वाजल्यापासून प्रवाशांना विमान तिकिट बुकिंग करता येणार आहे. शिकागो येथे सकाळी ९.३० वाजल्यापासून बुकिंग सुरु होणार आहे. सॅन फ्रॅन्सिस्को येथे सकाळी ७.३०  वाजता बुकिंग सुरु होणार आहे.

अधिक वाचा : प्राप्ती कर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ

कोरोना संकटामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. याच कारणास्तव भारत सरकारने 'वंदे भारत मिशन' अंतर्गत परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणले जात आहे.

अधिक वाचा : 'दिलबर दिलबर' फेम नोरा फतेहीचा बेली डान्सचा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ! (video)

 "