Tue, Jun 15, 2021 13:12
मोदी भाजपचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते : संजय राऊत

Last Updated: Jun 10 2021 9:14PM

संग्रहित छायाचित्र
मुंबई : पुढारी ऑनलाईन ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तीक भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चाना उधान आले. दरम्यान संजय राऊत यांनी आज नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे भाजप सत्तेत आली आहे. भाजप सत्तेत येण्यास मोदी यांची प्रतिमा मुख्य ठरली आहे तो भाजप महत्वाचे नेते आहेत. याचबरोबर ते भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत. जळगावात संजय राऊत पत्रकारांशी बातचीत केली.

अधिक वाचा : 'माझी दोस्ती पिंजऱ्यातील नव्‍हे जंगलातील वाघाशी'

राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान हे संपुर्ण देशाचे असतात ते कोणत्याही पक्षाचे नंतर असतात. याचबरोबर पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारात भाग घेऊ नये याचा सर्व भार प्रशासकीय यंत्रणेवर येतो. ते देशातील मोठे नेते आहेत. राज्यातील निवडणुकांमध्ये मोदीं ऐवजी स्थानिक नेत्यांचा चेहरा देण्याची तयारी आरएसएस करत आहे. मोदींची क्रेझ कमी झाली का असा सवाल राऊतांना विचारण्यात आला यावर राऊत म्हणाले मागच्या सात वर्षाच मोदींच्या चेहऱ्यावरच भाजप सत्तेत आली आहे हे विसरू नये. मोदींचा चेहराच सत्तेत येण्यास मुख्य कारण असल्याचेही राऊत म्हणाले. 

अधिक वाचा : पवारांचे राजकारण स्वाभिमानाचे की तडजोडीचे? राष्ट्रवादीच्या आधीही स्थापन केला ‘हा’ पक्ष 

यावेळी राऊत म्हणाले की, राज्यात पक्ष मजबुतीसाठी मी फिरत आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे आम्ही तीन्ही पक्ष मिळुन समन्वय साधत वेळोवेळी सकारात्मक बैठकाही घेत असल्याचे राऊत म्हणाले. 

अधिक वाचा : ठाकरे सरकारची शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक कर्जासाठी आता शुन्य टक्के व्याज

तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनावेळी शरद पवार शिवसेनेची प्रशंसा करत म्हणाले, शिवसेना आणि आपण एकत्र येऊ असं वाटलं नव्हत, पण आज एकत्र आहोत. शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही, पण महाराष्ट्रही शिवसेनेला अनेक वर्षांपासून पाहत आहे. माझा अनुभव विश्वासाचा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचं कौतुक केलं.