Sat, Sep 19, 2020 07:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 763 झाडांचा जीव जाणार!

763 झाडांचा जीव जाणार!

Last Updated: Jul 07 2020 1:05AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

धोरणामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. अशात मुंबईतील 763 झाडे कापण्याचे 13 प्रस्ताव प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समितीत सादर केले आहेत. यापैकी 8 प्रस्ताव बिल्डरांचे आहेत. त्यामुळे मंगळवारी होणार्‍या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेनेसह काँग्रेस, भाजपा सदस्य कोणता निर्णय घेणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वृक्ष प्राधिकरणासह स्थायी, सुधार, शिक्षण या वैधानिक समित्यांच्या बैठका गेल्या तीन महिन्यात झाल्या नाहीत. या बैठकांसाठी पालिकेतील शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष सातत्याने आग्रह धरत आहे. मात्र लॉकडाऊनचे कारण पुढे करत प्रशासन या बैठका घेत नाही. मात्र बिल्डरांचे हित डोळ्यासमोर ठेवून झाडे कापण्याचे विविध प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. मार्चपासून प्राधिकरणाची बैठक न झाल्याने मागील तीन महिन्यातील एकत्रित प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आले आहेत. त्यामुळे या बैठकीवर शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष व भाजपा बहिष्कार टाकणार का,  की बैठकीमध्ये सहभागी होऊन झाडे कापण्यास परवानगी देणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे

येथील झाडे कापणार

     भांडुप उषानगर नाला रूंदीकरण 121
     कांजूरगाव पूर्वमध्ये इमारतीचे बांधकाम 76
     हरीयाली, कांजूरगावात खासगी बांधकाम 35
     अंधेरी रेल्वे स्टेशन ते आंबोली पूल 36
     कांदिवली खासगी इमारत बांधकाम 22
     मुलुंड पोलिस गृहनिर्माण प्रकल्प 56
     वाकोला खासगी इमारत बांधकाम 18
     अंधेरी कुर्ला रोड खासगी इमारत बांधकाम 11
     सांताक्रुझ उन्नत मार्गाचे बांधकाम - 265
     सांताक्रुझ रेल्वेचा सहावा मार्ग 37
     मालाड चिंचोली खासगी इमारत बांधकाम 28
     कांजूर अग्निशमन केंद्र 12

 "