Thu, Aug 13, 2020 17:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमिताभ म्हणाले, 'कठीण समयी तुमचे खूप आभार' 

अमिताभ म्हणाले, 'कठीण समयी तुमचे खूप आभार' 

Last Updated: Jul 13 2020 10:04AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचा शहंशहा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रूग्णालयात उपचार सुरू हेत. या वृत्तानंतर देशभरातून त्यांचे फॅन्स त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर काही ठिकाणी त्यांच्या प्रकृतीसाठी पूजादेखील केली जात आहे. यासाठी बिग बी अमिताभ यांनी आपल्या फॅन्सचे आभार मानले आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले आहे, 'ज्यांनी माझ्यासाठी, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्यासाठी चिंता व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या. मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यासाठी खूप प्रेम. 

बिग बी यांनी आणखी एक ट्विट केले- माझ्यासाठी, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्यासाठी आपण ज्या प्रार्थना केल्या, त्यावर मला आता प्रतिक्रिया देता येत नाहीत. परंतु, मी हात जोडून केवळ हे सांगू इच्छितो की, आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद. 

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ यांचे चार बंगले - जलसा, प्रतिभा, जनक आणि वत्स सॅनिटायझेशन करून सील करण्यात आले होते. बंगल्यात काम करणाऱ्या ३० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सर्वांचे रिपोर्ट अद्याप यायचे आहेत.