Fri, Sep 25, 2020 16:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : दाटीवाटीने राहणाऱ्यांसाठी शाळांमध्ये व्यवस्था

मुंबई : दाटीवाटीने राहणाऱ्यांसाठी शाळांमध्ये व्यवस्था

Last Updated: Apr 10 2020 10:37AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार महत्त्वाची पावले उचलत आहे. मुंबईत झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था आता शाळांमध्ये केली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालये दर तासाला धुतली जाणार असून निर्जंतुकीकरण केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.कोरोना बाधित रुग्णांची मुंबईत होत असलेली वाढ ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

वाचा - पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी

“सार्वजनिक शौचालयांना दर तासाला धुणार आणि निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये सदस्य संख्या जास्त असल्यामुळे या लोकांची राहण्याची व्यवस्था शाळांमध्ये केली जाणार आहे. संसर्ग टाळावा यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. या लोकांची भोजनाची व्यवस्था कम्युनिटी किचनच्या माध्यमातून केली जाणार आहे’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

वाचा - राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!

“मुंबई महापालिकेने एक लाख किट्स रॅपिड टेस्टसाठी मागितले आहेत. केंद्राकडून ते लवकरच प्राप्त होतील. सर्वांत आधी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रॅपीड टेस्ट केली जाईल”, असं आरोग्य मंत्री म्हणाले. याशिवाय मुंबईत काही ठिकाणी डिसइन्फेकटंट टनलदेखील उभारले जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
 

 "