Thu, Jan 28, 2021 08:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण

मुंबईतील ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण

Last Updated: May 29 2020 10:06AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. मुंबईच्या ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर मृत्यूंचे प्रमाणही जास्त आहे. धारावीचा समावेश असलेल्या जी उत्तर विभाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. सुरूवातीला प्रथम क्रमांकावर असलेल्या वरळीचा समावेश असलेला जी दक्षिण विभाग ७ व्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला वांद्रे पूर्वचा एच पश्चिम पहिल्या पाच हॉटस्पॉटमध्ये येतो. मुंबईतील सर्वच २४ वॉर्डमधील रुग्णसंख्या ३०० च्या पुढे गेली आहे. 

वाचा - देशात बाधितांचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा उद्रेक!

मुंबईतील ११ हॉटस्पॉट -

जी उत्तर -  दादर, माहिम, धारावी-  २७२८ रुग्ण, ६१७ रुग्ण बरे झाले.

ई विभाग- भायखळा , मुंबई सेंट्रल -२४३८ रुग्ण- ८०३ रुग्ण बरे झाले.

पी उत्तर मालाड, मालवणी, दिंडोशी परिसराचा समावेश - २३७७ रुग्ण, ६७७ बरे झाले.

एल कुर्ला परिसराचा समावेश - २३२१ रुग्ण, ५१० रुग्ण बरे झाले.

एच पूर्व- वांद्रे पूर्व चा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ - (मातोश्री)- २०९४ रुग्ण, ६१५ रुग्ण बरे झाले.

के पश्चिम - अंधेरी पश्चिमचा भाग - २०४९ रुग्ण, ६७४ बरे झाले.

जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - १९०५ रुग्ण - ८३३ रुग्ण बरे झाले.

के पूर्व - अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - १८७५ रुग्ण, ५८३ बरे झाले.

एम पूर्व - गोवंडी, मानखुर्दचा समावेश - १६९६ रुग्ण, ४३५ रुग्ण बरे झाले.

एफ दक्षिण -परळ, शिवडीचा समावेश - १६४८ रुग्ण, ३९६ बरे झाले.

एन - घाटकोपरचा समावेश - १५२५ रुग्ण , ३०० बरे झाले.