Sat, Oct 24, 2020 23:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार

आयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार

Last Updated: Sep 23 2020 1:33AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या माहितीच्या आधारावरून आयकर विभागाने धाडलेल्या नोटिशीला आपण लवकरच उत्तर देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेत इतके खासदार असतानाही आपल्यालाच आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यावरून आमच्याबद्दल या विभागाला प्रेम आहे, अशी कोपरखळीही पवार यांनी लगावली. 

पहिली नोटीस आपल्याला निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेत आयकर विभागाच्या नोटिशीबाबत पवार यांना विचारले असता, सुप्रिया सुळे यांना नाही, तर आपल्यालाच  पहिली नोटीस आयकर कार्यालयाकडून आली  असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

आपल्याला सोमवारी नोटीस आली आहे. काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. त्याचे उत्तर लवकरच आपण देऊ. कारण उत्तर दिले नाही तर दिवसाला 10 हजार रुपये दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

 "