Tue, Jun 15, 2021 13:16
WhatsApp वरुन पैसे कसे पाठवायचे?

Last Updated: Jun 11 2021 1:50PM

file photo
पुढारी ऑनलाईन डेस्क :  मागच्या काही वर्षात भारतात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढल आहे. कित्येक मोठ्या कंपन्या डिजिटल पेमेंट सॉल्युशन सेक्टरमध्ये उतरल्या आहेत. यात आघाडीवर गुगल पे, फोन पे हे ॲप आहेत. आता मेसेजिंग प्लॅटफॉर्म वरील प्रसिध्द असणारे WhatsApp सुध्दा डिजिटल पेमेंटमध्ये उतरले आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये ही सुविधा WhatsApp ने सुरु केली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या सुविधेला मंजुरी दिली. भारतात सगळ्यात जास्त WhatsApp चे वापरकर्ते आहेत. जर तुम्ही WhatsApp pay' वापरणार असाल तर तुम्ही या ट्रिक्सचा वापरुन WhatsApp वरुन पैसे पाठवू शकता. 

वाचा : महाराष्ट्रात ३० वर्ष सेवा देताय आणि तेथील पोलिसांवर विश्वास नाही? परमबीर सिंगांना तगडा झटका!

अशी करा पेमेंट सेटींग

पहिल्यांदा WhatsApp ओपन करा. वरती उजव्या बाजूली तीन डॉट आहेत. त्यावरती क्लिक करुन ओपन करा. पेमंट ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे अॅड पेमेंट मेथड वरती क्लिक करा. यातनंतर आपल्याला बँकांची यादी मिळेल. या यादीमधील आपली बँक सिलेक्ट केल्यानंतर आपला मोबाईल नंबर जो नंबर बँकेला लिंक आहे तो त्यात द्या. नंबर दिल्यानंतर आपल्याला फोनवर एक व्हेरीफाय व्हाया एसएमएस सिलेक्ट करावा लागेल. व्हेरिफिकेशन प्रक्रिया झाल्यानंतर पेमेंट सेटींग पूर्ण करा. 

असे पाठवा पैसे

WhatsApp वर पेमेंट सेवेचा वापर करायचा असेल तर तुमच्याजवळ UPI पिन असणे गरजेचे आहे. WhatsAppवर पैसे पाठवण्यासाठी अटॅचमेंट ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करुन त्यात रक्कम टाकायची आहे. पुढ UPI पिन टाकून पैसे पाठवू शकता.   

ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल. तुमचा WhatsApp नंबर आणि बँकेला लिंक केलेला नंबर एकच असावा लागणार आहे. WhatsApp ची ही सेवा आयओएस आणि ॲन्ड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्म वापरु शकता. जर तुम्ही पैसे पाठवणार असाल तर या ट्रिक्सचा वापर करुन पैसे पाठवू शकता.

तुम्हाला पैसे पाठवणार आहेत त्यांच्याकडे WhatsApp pay' नसेल तर तुमच्या युपीआय आयडीला ते गुगल पे, फोन पे व्दारे पैसे पाठवू शकतात. ते पैसे आल्यानंतर WhatsApp वरुन तुम्हाला कन्फर्मेशन चा एसएसएस येईल.

वाचा :आधारकार्डला मोबाईल नंबर कसा अपडेट कराल?

वाचा :पेट्रोल डिझेल दरवाढीचा हाहाकार सुरूच; महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्‍यता!