Fri, Jul 03, 2020 03:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुढच्या ५ वर्षाच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार: संजय राऊत

पुढच्या ५ वर्षाच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार: संजय राऊत

Last Updated: May 26 2020 11:43AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, हे सरकार आपले नसून शिवसेनेचे आहे, अशी खदखद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर 'महाविकासआघाडीत बिघाडी' अशी राजकीय वर्तुळात सुरू झाली. दरम्यान, राजभवनाकडे अनेक नेत्यांच्या फेऱ्या होऊ लागल्याने ठाकरे सरकारच्या अस्थिरतेच्या चर्चेला उत आला.  मात्र, या चर्चेला पुर्णविराम देत खासदार संजय राऊत यांनी पुढच्या ५ वर्षाच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, 'पोटदुखी'चा त्रास असलेल्या विरोधकांना खेळ करायचे असतील तर करा त्यांना शुभेच्छा असल्याचेही यावेळी म्हटले आहे. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी काल(दि.२५) मातोश्री वर गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले. मात्र, या सर्व गोष्टींना बगल देत खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे महाराष्ट्राचे सत्तेचे शिल्पकार आणि मार्गदर्शक आहेत. आम्ही बैठकीसाठी पवारांच मार्गदर्शन घेतल आहे. मातोश्रीवर पवार यापूर्वीही अनेकवेळा आले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री नेते शरद पवारांची विविध विषयांवर चर्चा करतात. त्यामुळे पवारांच्या मातोश्रीवरील भेटीवरून गदारोळ होण्याच कोणतही कारण नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यासोबत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.  विरोधकांना खेळ करायचे असतील तर त्यांना शुभेच्छा असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. 

तसेच, हे सरकार स्थिर असुन महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नाहीत त्यामुळे महाविकासआघाडीच सरकार हे पुढील ५ वर्ष राहणार असल्याचा ठाम विश्वास राऊतांनी व्यक्त केला. यासोबतच पुढच्या ५ वर्षाच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार.  कदाचित विरोधी पक्षाचे काही आमदार महाविकासआघाडीत येतील. आणि तस झाल तर २०२५ मध्ये आमचा बहुमतांचा आकडा १७० वरून १८० होऊ शकतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

तसेच, या सर्व घडामोडींवरही राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक पार पडल्याची माहिती दिली आहे. सोबतच कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी असा टोला लगावला आहे. सरकार मजबूत आहे, चिंता नसावी असेही ते म्हणाले आहेत. याचबरोबर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याबाबत कोणतीही चर्चा सरु नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

'शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे तगडे नेते राज्य आणि देश कठीण काळातून जात असताना चर्चा करत असतरी तर त्याचा कोणाला त्रास करुन घेण्याची गरज नाही. मी तरी अमित शहा किंवा गडकरीजी यांच्याकडून राष्ट्रपती राजवटीची चर्चा ऐकली नाही त्यामुळे मी कशावरही कसा विश्वास ठेऊ?' असे संजय राऊत म्हणाले.