Fri, Jun 05, 2020 17:35
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केला लोकलने प्रवास

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केला लोकलने प्रवास

Last Updated: Oct 17 2019 9:37PM

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयलमुंबई :  प्रतिनिधी

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी करवा चौथ सण साजरा करण्यासाठी वाहन वाहतूक टाळून मुंबई लोकलने प्रवास केला. त्यांचा लोकल प्रवास हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भाजपमधील मोठे नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभेत उपस्थित राहत आहेत. मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रचाराकरिता पियुष गोयल यांनी मिरा भाईंदरमध्ये हजेरी लावली.

त्यानंतर आज करवा चौथ असल्यामुळे त्यांनी वाहतूक कोंडीत न अडकता रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. भाईंदर स्थानकापासून ग्रँटरोडपर्यंतचा प्रवास केल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.