Sun, Sep 20, 2020 05:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह टॉपर

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह टॉपर

Last Updated: Aug 04 2020 12:35PM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत प्रदीप सिंह यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. तर जतिन किशोर आणि प्रतिभा वर्मा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची विविध पदांवरील नियुक्त्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे.

वाचा : पुण्यासह ७ जिल्ह्यांना आज-उद्या ‘रेड अ‍ॅलर्ट’

या परीक्षेतून जे पात्र ठरले आहेत त्या उमेदवारांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांची यादी यूपीएससीने जाहीर केली आहे. लेखी परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. तर फेब्रुवारी- ऑगस्ट २०२० दरम्यान व्यक्तिमत्व चाचणी घेतली होती. त्याचा अंतिम निकाल जाहीर केला आहे.

वाचा : ...अन् कोरोना रुग्ण गहिवरले

गुणवत्तेनुसार उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा (ग्रुप ए आणि ग्रुप बी) या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

अंतिम निकाल https://www.upsc.gov.in/ यावर पाहता येईल. 

 "