Tue, Jul 07, 2020 06:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यूपीएससी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

यूपीएससी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

Last Updated: Jun 05 2020 4:01PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संक्रमणामुळे याआधी यूपीएससीची पूर्वपरीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली होती. आता यूपीएससीने आज, शुक्रवारी यूपीएसएसी परीक्षा आणि मुलाखतींसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले.

वाचा : चिंता वाढवणारा कोरोनाग्रस्त भारत, २ दिवसांत २५ हजार नवे रुग्ण 

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि आयएफएस पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. तर यूपीएससी मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी आणि भारतीय वनसेवा (मुख्य) परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

एनडीए आणि एनए परीक्षा (I) आणि एनडीए आणि एनए परीक्षा (II) ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. यूपीएससीच्या उर्वरित परीक्षार्थींच्या मुलाखतींना २० जुलैपासून सुरुवात होणार असून मुलाखतीच्या तारखा परीक्षार्थींना स्वतंत्रपणे आयोगाकडून कळविण्यात येतील. 

वाचा : पल्लकडमधील हत्तीण मृत्यू प्रकरणी एकाला अटक

देशाच्या अनेक भागात कोरोना विषाणूचे संक्रमण अतिशय वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर याआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

युपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी नोंदणी करतात. जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात यादृष्टीने लोकसेवा आयोग अर्ज मागवित असते. दरवर्षी पूर्वपरीक्षा एप्रिल/मे महिन्यात होत असते तर मुख्य परीक्षा जून महिन्यात होत असते. तथापि कोरोना संक्रमणामुळे परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.