Sat, Sep 19, 2020 07:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वीस वर्षांनी सोन्याच्या भावात विक्रमी वाढ

वीस वर्षांनी सोन्याच्या भावात विक्रमी वाढ

Published On: Jun 27 2019 1:41AM | Last Updated: Jun 27 2019 1:39AM
मुंबई : वृत्तसंस्था

जागतिक पातळीवर तब्बल वीस वर्षांनंतर सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. भारतातही सोन्याच्या दराने 35 हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर असेच वाढत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेतील बँकांनी सोन्याच्या व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी सुरू केली आहे. त्याचा परिणाम म्हणून जगात सोन्याचे दर वाढत आहेत. अमेरिका-इराण ताणलेले संबंध, तेलाचे पडलेले भाव, डॉलरची घसरलेली किंमत अशा अनेक कारणांचाही सोन्याच्या दरवाढीवर परिणाम होत आहे. सन 2000 नंतर सोन्यामध्ये इतकी मोठी दरवाढ प्रथमच पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव उच्चांकी स्तरावर पोहोचतात, त्यावेळी मंदीसदृश स्थिती उद्भवण्याचा धोका असतो. जागतिक बाजारपेठेत सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे वर्षाअखेरपर्यंत सोन्याचा भाव 38 हजार रुपयांपर्यंतही पोहोचू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.