Sat, Oct 31, 2020 13:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जैन मंदिरांचे डायनिंग हॉल्स किमान नऊ दिवस उघडू द्या

जैन मंदिरांचे डायनिंग हॉल्स किमान नऊ दिवस उघडू द्या

Last Updated: Oct 19 2020 1:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जैन धर्मातील पवित्र आयंबिल ओली आराधनेसाठी जैन मंदिरांतील डायनिंग हॉल्स उघडण्यास मुभा द्या, अशी विनंती एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. श्री ट्रस्टी आत्मा कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टने यासंदर्भात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच अन्य नियमांचे पालन करू, अशी हमी ट्रस्टने दिली आहे .

मुंबईतील जैन मंदिरे खुली करण्यास परवानगी द्या, अशी याचिका याआधीच दाखल करण्यात आलेली आहे. त्याच याचिकेत ट्रस्टच्या वतीने अ‍ॅड. काव्यल शाह आणि गुंजन शाह यांनी नव्याने अर्ज केला आहे. त्यावर उद्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जैन मंदिरांतील डायनिंग हॉल्स सर्वसाधारण 1000 ते 1500 चौरस फुटांचे आहेत. 23 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर यादरम्यान आयंबिल ओली आराधनेचा उत्सव आहे. या उत्सवांतर्गत भाविकांच्या उपवासाच्या विशेष भोजन व्यवस्थेसाठी डायनिंग हॉल्स खुले करण्यास परवानगी द्या, आम्ही यादरम्यान भाविक सोशल डिस्टन्सिंग पाळतील या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत प्रत्येक भाविकाला एक तासाच्या प्रवेशासाठी पास दिला जाईल. याद्वारे कोरोना नियमांचे पालन केले जाईल, अशी हमीही ट्रस्टने आपल्या अर्जातून दिली आहे. याप्रकरणी उद्या सोमवारी 19 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 "