Fri, Dec 04, 2020 05:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकल, बेस्ट, मेट्रोचा प्रवास आता एकाच कार्डावर

लोकल, बेस्ट, मेट्रोचा प्रवास आता एकाच कार्डावर

Published On: Dec 11 2017 1:55AM | Last Updated: Dec 11 2017 1:39AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महानगर क्षेत्रात प्रवाशांना एकाच कार्डद्वारे मेट्रो, बेस्ट आणि रेल्वे मार्गावर प्रवास करता यावा यासाठी एमएमआरडीएतर्फे लवकरच इंटीग्रेटेड कार्डाची सेवा सुरू कण्यात येणार आहे. या प्रणालीसाठी 25 डिसेंबरला निविदा काढण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

मुंबईमध्ये मोनोरेल, मेट्रो, रेल्वे आणि बेस्ट अशा विविध मार्गांवर प्रवास करताना प्रवाशांना प्रत्येकवेळी तिकिट घेण्यासाठी आता वेगळी रांग लावावी लागणार नाही. एमएमआरडीएतर्फे इंटीग्रेटेड कार्डाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मिळाला आहे. या अहवालानुसार एमएमआरडीएतर्फे निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमएमआरडीएतर्फे एप्रिल 2018 रोजीपर्यत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम हे दोन्ही बाचणार आहेत. सर्वात आधी ही सेबा बेस्टमध्ये सुरू करण्यात येणार असून यानंतर मोनोरेलच्या दोन्ही टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यानंतर मेट्रो मार्गावर या कार्डाचा वापर सुरू करण्यात येणार आहे. यानंतर रेल्वे मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. अशी टप्प्याटप्प्याने या कार्डाची सेबा सुरू करण्यात येणार आहे.  

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये बस, रेल्वे, मेट्रो मोनो अशा विविध वहतुक सेवा आहेत. या विविध मार्गांवर एकाच कार्डाद्वारे प्रवास करता यावा यासाठी इंटीग्रेटेड कार्ड सुरू करण्याची घोषणा यापुर्वी 2013 साली क्‍लरण्यात आली होती. मात्र आता लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा सुरू झाल्यावर ही सेवा सुरू करणारा भारत देश हा चौथा असेल. ही सेवा सुरू करण्यास एमएमआरडीए अंतीम टप्यामध्ये आहे.