होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ; राज्यातील ३६३ बंदिवानांना लागण 

तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ; राज्यातील ३६३ बंदिवानांना लागण 

Last Updated: Jul 02 2020 11:52AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यातील विविध तुरूंगात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह यासारख्या तुरूंगातील एकूण ३६३ बंदिवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तुरूंगातील १०२ कर्मचारीदेखील कोरोनाने बाधित आहेत, अशी माहिती महाराष्ट्र तुरूंग विभागाने दिली आहे. 

आतापर्यंत एकूण २२५ बंदिवान आणि तुरूंगातील ८२ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.   

मुंबई मध्यवर्ती कारागृहात कोरोना पॉझिटिव्ह बंदिवानांची संख्या सर्वात अधिक १८१ एवढी आहे. तर तुरुंगातील ४४ कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  त्याचबरोबर ठाणे मध्यवर्ती कारागृहात पॉझिटिव्ह बंदिवानांची संख्या ३ असून तुरूंगातील १५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापूर जिल्हा कारागृहात ६२ बंदिवान तर १३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Image