Wed, Apr 01, 2020 23:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : फेरीवाल्यांना पाठीशी घालणारे तीन अधिकारी निलंबित

कल्याण : फेरीवाल्यांना पाठीशी घालणारे तीन अधिकारी निलंबित

Last Updated: Feb 20 2020 7:43PM

संग्रहितकल्याण : पुढारी वृतसेवा

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील महत्वाचे शहर असलेल्या कल्याण व डोंबिवलीत रेल्वे स्टेशनला जोडणारा स्काय वॉक उभारला आहे. या स्काय वॉकला फेरीवाल्यांनी गराडा घालत बस्तान मांडले आहे. त्यामुळे या स्कायवॉकवरून रेल्वे प्रवाशांना चालणे मुश्कील झाले आहे. पालिकेच्या नवनियुक्त आयुक्तांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या या गंभीर प्रश्नावर लक्ष घातले आहे. 

डोंबिवलीतील स्कायवॉकची पाहणी केली असता स्कायवॉक वरील फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढताना पालिका आयुक्तांनाही जिकरीचे झाले.अशीच परिस्थिती कल्याणच्या स्कायवॉकची असल्याने पालिका आयुक्तांनी या घटनेची दखल घेत कारवाईचा बडगा उगारला. फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या पालिकेच्या दोन्ही प्रभागातील प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह फेरीवाला हटाव मोहिमेच्या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबनाचे कारवाई आदेश प्रशासनाला देत पालिका आयुक्तांनी कामचोर अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे .

वाचा :'शिवसेना सहन करेल पण भाजप आणि जनता तुम्हाला धडा शिकवेल'

दोन्ही बाजुला असलेल्या फेरीवाल्यांच्या गर्दीतून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा या फेरीवाल्यांच्या मुजोरीला नागरिकांना सामोरे जावे लागते. पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने फेरीवाल्यांचे चांगलेच फावले आहे. याबाबत नागरिक त्रस्त असून अशा मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

वाचा :'स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे प्रसारण थांबवा'

या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काल रात्रीच्या सुमारास कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरतील स्कायवॉकवर सरप्राईस व्हिजीट दिली. यावेळी दोन्ही स्कायवॉक वर फेरीवाले असल्याचे निदर्शनास आले आयुक्तांनी स्कायवॉकवर पायी चालत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना एका तासात स्कायवॉक वरील फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले.

तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला होता. आज आयुक्त सूर्यवंशी यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 'फ' प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे, 'क' प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, फेरीवाला हटाव पथक प्रमुख गणेश माने या तिघांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .

वाचा :सोन्याने घाम फोडला;इतिहासातील सर्वाधिक दरवाढ