Thu, Jul 09, 2020 09:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : भरधाव ट्रकने तिघांना चिरडले (video)

डोंबिवली : भरधाव ट्रकने तिघांना चिरडले (video)

Last Updated: Dec 03 2019 1:14PM
डोंबिवली : प्रतिनिधी

डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात आज सकाळच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत महिला आणि पुरुषासह एका चिमुरडीचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अजून मृतांची नावे समजू शकली नाहीत. 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.