नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारतीय लष्करी सेवेत भर्ती होऊन देशाची सेवा करावी असे अनेक तरूणाचे स्वप्न असतं. त्यामुळे अनेक तरूण यासाठी प्रयत्न करत असतात. देशातील ८ वी आणि १० वी पास झालेल्या तरूणांना देशसेवा करण्याची सध्या संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दलात सैनिक (जीडी), सैनिक टेक्निकल, शिपाई- क्लार्क, शिपाई स्टोअरकीपर, ट्रेड्समन (10 वी पास), ट्रेडसमॅन (8 वी पास) आणि सैनिक नर्सिंग असिस्टेंट (सहाय्यक) या पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. अर्ज भरण्याचा कालावधीत ११ जानेवारी २०२१ ते २४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान आहे.
अधिक वाचा : पंतप्रधान फसल बिमा योजनेला पाच वर्ष पूर्ण
सैन्याच्या भरती अधिसूचनेनुसार, ११ फेब्रुवारीपासून उमेदवारांसाठी १२ मार्च ते २४ मार्च २०२१ या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजित केले आहे. यानंतर उमेदवारांचे शारीरीक आणि बौद्धीक क्षमतेची परिक्षा घेतली जाणार आहे. यासाठी भरतीच्या 15 दिवस अगोदर उमेदवारांना ॲडमिट कार्ड मिळणार आहे. हे ॲडमिट कार्डची माहिती उमेदवारांच्या ईमेलवर पाठविली जाईल. याशिवाय ज्या उमेदवाराकडे ॲडमिट कार्ड नसल्यास त्यानां प्रवेश दिला जाणार नाही. देशातील सर्व राज्यांतील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
सैनिक (जीडी)
सैनिक जीडी या पदासाठी उमेदवारांचे वय १७ ते २१ दरम्यान असावे. उमेदवारांचे जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते १ एप्रिल २००३ या दम्यानचा असावा. याशिवाय उमेदवार ४५ टक्के ते ३३ टक्के गुणांनी १० वी उतीर्ण झालेला असावा.
सैनिक (टेक्निकल)
सैनिक टेक्निकल या पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा १७ ते २३ वर्ष असावे. उमेदवारांचे जन्म १ ऑक्टोबर १९९७ ते १ एप्रिल २००३ या दरम्यानचा असावा. याशिवाय उमेदवार १० आणि १२ वी जास्तीत जास्त ५० टक्के आणि कमीत कमी ४० टक्के गुणांनी पास झालेला असावा.
सैनिक (ट्रेड्समॅन)
सैनिक ट्रेड्समॅन या पदासाठी उमेदवार किमान १० वी पास असावा. या पदासाठी उमेदवारांचे वय १७ ते २३ वर्ष असावे. उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९७ ते १ एप्रिल २००३ या दरम्यान झालेला असावा. याशिवाय उमेदवार १० वी पास ३३ टक्क्यांनी झालेला असावा.
सैनिक (ट्रेड्समॅन)
सैनिक ट्रेड्समॅन या पदासाठी वयोमर्यादा १७ ते २३ वर्ष असावे. उमेदवारांचे जन्म १ ऑक्टोबर १९९७ ते १ एप्रिल २००३ या दरम्यानचा असावा. याशिवाय उमेदवार ८ वी पास ३३ टक्के गुणांनी असावा.