लेट नाईट वेब सिरीज बघण्याच्या सवयीने वाचवला ७५ लोकांचा जीव

Last Updated: Oct 30 2020 5:54PM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कल्याण डोंबिवलीमधील कोपर भागतील दोन मजली इमारत गुरुवारी (दि. २९) पहाटे ४ च्या सुमारास कोसळली. मात्र एका तरुणाच्या सतर्कतेमुळे या इमारतीतील ७५ लोक दुर्घटनेआधीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. कुणाल मोहिते (वय १८) याला रात्री उशिरापर्यत जागून वेब सिरिज बघण्याची सवय आहे. याच सवयीमुळे जागा असणाऱ्या कुणालला दुर्घटनेचा अंदाज आल्याने त्याने इमारतीमधील लोकांना वेळीच सावध करत सुरक्षितपणे इमारतीतील लोकांना बाहेर काढले आणि त्यानंतर इमारत कोसळली.

कुणाल हा नेहमी वेब सिरीज पहाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागा राहतो. येरवी तो २ पर्यंत झोपतो पण, त्या दिवशी झोप लागत नसल्यामुळे पहाटे ४ पर्यंत वेब सिरिज बघत बसला होता. दरम्यान त्याला त्याच्या किचनमधील काही भाग ढासळत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्याने घरातल्यांना जागे करत घडणाऱ्या गोष्टीची कल्पना दिली. तसेच त्याने संपूर्ण इमारतीमधील सर्व लोकांना जागे करुन इमारत कोसळत असल्याची माहिती दिली. वेळीच सावध झाल्याने इमारतीमधील तब्बल ७५ लोक इमारतीमधून सुरक्षितरीत्या बाहेर पडले आणि अवघ्या पाच मिनिटांच्या आत संपूर्ण इमारत कोसळली. 

ही इमारत धोकादायक असल्याने पालिकेकडून ९ महिन्यांपूर्वीच इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली होती. परंतु कोणीही इमारतीतील घर सोडले नाही. अखेर ही इमारत गुरुवारी कोसळली. कुणालयाच्या सतर्कतेमुळे सर्व लोक सुखरुप बजावले. याबाबत नोटीसबाबत इमारतीमधील लोकांना विचारले असता, या इमारतीमधील सर्वच लोक गरीब असून दुसरीकडे जाण्यासाठी पुरेशी आर्थिक क्षमता नसल्यामुळे लोक या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत होते.

श्रीलंकेतील तुरुंगात उसळली दंगल; ८ कैद्यांचा मृत्यू, ३७ जण जखमी


ब्रेकिंग : आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे यांची आत्महत्या


इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती; दहावी पासवाल्यांना थेट ५० हजार पगाराची संधी! 


कोरोनाचा दिल्लीसह केरळमध्ये उद्रेक; एका दिवसात आढळले सर्वांधिक रुग्ण


लष्कर आणि रॉ प्रमुख नेपाळमध्ये, अजित डोभाल श्रीलंकेत! रणनीती आहे तरी काय?


पैसे राहू देत जिवंतपणी मानपत्र तरी द्या, लोकशाहीराची सरकारकडे मागणी 


धर्मासाठी बॉलिवूडला रामराम केलेल्या सना खानचा गुजरातचा मौलवी पती आहे तरी कोण?


दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, वॉर्नर 'आऊट'


उर्मिला मातोडकरांचा शिवसेना प्रवेश मुहूर्त ठरला! अखेर संजय राऊतांकडून शिक्कामोर्तब


airtel कडून ११ जीबी डेटा फ्री; 'असा' घ्या लाभ!