Thu, Jun 24, 2021 12:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन

ठाणे जिल्हा १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन

Last Updated: Jul 11 2020 7:39PM
ठाणे : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर महापालिकांप्रमाणे आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका, मुरबाड, शहापूर नगरपंचायतींसह ठाणे ग्रामीण भागात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज घेतला आहे. त्यामुळे  संपूर्ण ठाणे जिल्हा पुन्हा लॉकडाऊन मोडमध्ये गेला आहे.

अधिक वाचा : गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जाहीर; मंडळांना 'एवढ्याच' उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार!

मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ  होऊ लागल्याने ठाणे जिल्हाधिकारी आणि सहा महापालिका आयुक्तांनी २ जुलै ते १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन लागू केले. तरी देखील रुग्णांमध्ये घट होण्याऐवजी विक्रमी वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यात  अर्धा लाखाहून अधिक रुग्ण संख्या झाली असून दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सातत्याने वाढत असल्याने  राज्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी ७ दिवस म्हणजे १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह अन्य महापालिकांनी कालच जाहीर केला आहे. मात्र उर्वरीत ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन वाढेल का याबाबत चर्चा सुरू झाली असताना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी परित्रपक काढून १९ जुलैपर्यंत ठाणे ग्रामीण भागातील लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अधिक वाचा : 'धारावी मॉडेल'चे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक; मुख्यमंत्र्यांनी दिली शाब्बासकी!

त्यानुसार अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका, शहापूर नगरपंचायत, मुरबाड नगरपंचायत, भिवंडी, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, शहापूर तालुक्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी काढलेले लॉकडाऊनचे आदेश लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुणी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध केल्यास कायदेशीर अथवा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

अधिक वाचा : धारावीत आरएसएसने कोणताही आवाज न करता रात्रंदिवस काम केलं! : नितेश राणे