Tue, Jul 07, 2020 23:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : अँटिबायोटिक दिल्याने रुग्णांना रक्ताच्या उलट्या!

ठाणे : अँटिबायोटिक दिल्याने रुग्णांना रक्ताच्या उलट्या!

Last Updated: Dec 03 2019 8:26AM

मंत्री एकनाथ शिंदेअंबरनाथ (ठाणे) : प्रतिनिधी 

अंबरनाथ येथील डॉ. बी जी छाया या उपजिल्हा रुग्णालायमधील रुग्णाना मोनोसेफ हे अँटिबायोटिक इंजेक्शन दिल्याने काही रुग्णांना रक्ताच्या उलट्या झाल्याचा प्रकार घडला आहे. रुग्णाना तात्काळ उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेंट्रल हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांची विचारपूस केली. या वेळी त्यांच्या सोबत आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, नगरसेवक सुभाष साळुंखे, उल्हासनगरचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. 

सोमवार रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर रुग्णाना छाया रुग्णालयातून सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणले गेले. १० ते १२ रुग्णांपैकी ५ रुग्णांना उल्हासनगर येथील क्रीटी केअर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील रुग्णाचीही विचारपूस मंत्री शिंदे यांनी केली व येथील रुग्णालयाचा सर्व खर्च आम्ही करू, असे त्यांनी सांगितल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना समाधान मिळाले. ज्या इंजेक्शनमुळे रुग्णाना हा त्रास झाला त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले, तसेच छाया रुग्णालयाला आवश्यक सुविधा व उपकरणे देण्यात येणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.