Tue, Aug 04, 2020 14:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्री एकनाथ शिंदेंच्या पीएला कोरोनाची लागण

मंत्री एकनाथ शिंदेंच्या पीएला कोरोनाची लागण

Last Updated: Jul 14 2020 4:28PM
ठाणे : पुढारी ऑनलाईन 

नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्विय सहाय्यकला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले.

मंत्री शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांनी यापूर्वी मीरा भाईंदर महापालिका, तसेच उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. काही महिन्यांपासून ते मंत्री शिंदे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेतही उपायुक्त म्हणून काम केलेले आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची ही तपासणी केली जाणार आहे. काही महत्त्वाच्या व्यक्तींची तपासणी झाली असून त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह  आला आहे.