Wed, May 12, 2021 01:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना योद्धा डॉक्टरांना तेजस्विनी पंडितचा सलाम!

कोरोना योद्धा डॉक्टरांना तेजस्विनी पंडितचा सलाम!

Last Updated: Oct 19 2020 12:38PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रत्येक वर्षी नवरात्रीत नवा उपक्रम राबवते. ती सोशल मीडियावर आपले खास फोटो शेअर करत असते. आतादेखील तिने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपला एक खास फोटो शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. तिने या फोटोला कॅप्शन लिहिली आहे की... 

'दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला...
अन मग मी सोडून त्रिशूळ भाला
हाती stethoscope धरला...
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस
आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस,
विसर त्याचा पाडू नकोस.'

शेअर केलेल्या फोटोत तेजस्विनी पंडित पीपीई किट घालून नाकामध्ये नथ घालून डॉक्टरांच्या रुपात दिसत आहे. 

तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये  चर्चेचा विषय असतो.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते. यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई किट घातलेली रूग्णांना जीवनदान देणारी देवी तेजस्विनीने साकारलेली आहे. आपल्या ह्या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “ रूग्णांचे प्राण वाचवणं ही विज्ञानाने डॉक्टरांना दिलेली ‘दैवी’ देणगी आहे. कोणत्याही संकटकाळी आपण देवाचा धावा करतो. आणि पहा ना. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेशी निगडीत कर्मचारी कसे देवासारखे धावून आले. आपली वैयक्तिक सुखदु:ख विसरून अहोरात्र रूग्णसेवा करणा-या डॉक्टरांमधल्या दैवी कर्माला ह्या फोटोव्दारे वाहिलेली ही आदरांजली आहे.”  

नवरात्री फोटोशूट करण्याची संकल्पना तेजस्विनी पंडितने सिनेसृष्टीत आणली. आता अनेकजणं वेगवेगळ्या रूपांमधली फोटोशूट करत असतात. २०१७ पासून तेजस्विनी पंडित दरवर्षी एका नव्याविषयासह नवरात्रीचे फोटोशूट करत असते. तेजस्विनी ह्याविषयी सांगते, “२०१७ ला आजूबाजूच्या परिस्थितीवर आपण काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटलं. आणि एक फोटोशूट केलं. सोशल मीडियावर फोटो येताच अनेकांनी पाठ थोपटली. आता तर ‘नवरात्रीत काय घेऊन येणार’ अशी चाहत्यांकडून आवर्जून विचारणा होऊ लागलीय. त्यामूळे हुरूप येतो आणि एक जबाबदारीचीही जाणीव असते. प्रत्येक वर्षी मी त्यावेळी मनात जे काही खदखद असते, ते नवरात्री  फोटोशूटमधून  व्यक्त  होते, या  फोटोशूटमागे  अर्थातच  माझ्या टिमचा खूप सपोर्ट असतो.”

View this post on Instagram

प्रतिपदा : . . दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला... अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला... घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस. . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #devbarekaro #coronawarriors #thankyou #doctors #nurses #wardboys #healthcareworkers #tejaswwini #gratitude

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on