Wed, Dec 02, 2020 09:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांनाच कोरोना

कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांनाच कोरोना

Last Updated: Jul 02 2020 1:38AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनाच आता करोनाची लागण झाली झाली असून भायखळ्याच्या प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांना मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आणि त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना ऑक्सिजन देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रत्यक्ष उपचार करणार्‍या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने एप्रिलमध्ये विशेष टास्क फोर्स स्थापन केले. या टास्क फोर्सकडून राज्यातील संपूर्ण कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते. या टास्क फोर्सच्या प्रमुखपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली.

मंगळवारी ( ता. 14 जून) रोजी त्यांना प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे ट्विट (ता.16 ) रोजी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले होते. या ट्विटमध्ये गलगली यांनी विविध आजारांच्या त्रासामुळे डॉक्टर प्रिन्स अली रुग्णालयात त्यांची कोरोना पडताळणी होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डॉ. ओक यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ओक यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र याबाबत संबंधित रुग्णालय वा टास्क फोर्समधील अन्य सदस्यांकडून अद्याप अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मंगळवार 16 जूनपासून तर बुधवार (ता.1) पर्यंत डॉ संजय ओक यांना कोरोना झाल्याची माहिती प्रिंस अली खान रुग्णालयाने का लपवली, असा सवाल गलगली यांनी उपस्थित केला असून जर माहिती लपवली असेल रुग्णालयावर गुन्हा दाखल करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर राज्याचे मुख्य सचिव, पालिका आयुक्त यांच्या कोरोनासंदर्भात होणार्‍या बैठकांमध्ये डॉ. ओक हे टास्क फोर्सचे प्रमुख असल्याने सहभागी होत असे. तसेच यांचा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क आला आहे.

आरोग्य संचालकांच्या शिपायालाही कोरोनाची बाधा

राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्या कार्यालयातील शिपायालाही कोरोना झाली आहे. या शिपायाला ताप येत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. हा शिपाई शनिवारपर्यंत कामावर येत होता. तसेच तो अनेक अधिकारी व उपस्थित कर्मचार्‍यांच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

केईएम अधिष्ठाता कार्यालयात कोरोना

केईएम रुग्णालयातील कोविड 19 नोडल ऑफिसरांसहित ऑपरेटर आणि अन्य एका कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र याबद्दल केईएम अधिष्ठात्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.