Sun, Oct 25, 2020 07:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता श्वेता तिवारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

आता श्वेता तिवारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Sep 23 2020 8:51PM

संग्रहीत फाेटाेमुंबई : पुढारी ऑनलाईन

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तीचे चर्चेत येण्याचे कारण म्‍हणजे तिला कोरानाची बाधा झाल्‍याचे समोर आले आहे. श्वेताने स्‍वत: याबाबतची माहिती दिली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर श्वेताने १ ऑक्‍टोबरपर्यंत क्‍वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'मेरे डॅड की दुल्‍हन' या मालिकेत श्वेता तिवारी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. 

अधिक वाचा : टाईमच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींबरोबर 'शाहीन बाग'ची दादीही!

गेल्‍या काही दिवसांपासून श्वेता तिवारीची तब्‍येत बरी नसल्‍याची माहिती एका वृत्‍तसंस्‍थेने दिली. श्वेताने कोरोनाची टेस्‍ट केली होती. यामध्ये तिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

अधिक वाचा : शरद पवारांना आयकर नोटिस, आयोगाचा खुलासा

गेल्‍या काही महिन्यांपासून टीव्ही कलाकारांना तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलेब्‍स कोरोना पॉझिटिव्ह असल्‍याचे समोर आले आहे. यामध्ये पार्थ समाधान, कसोटी जिंदगीचे २ मुख्य कलाकारही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर श्रेणु पारिख, हिमानी शिवपुरील, सारा खान, राजेश कुमार, राजेश्वरी सचदेव आणि सचिन त्‍यागी यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. 

 "