Fri, Oct 30, 2020 04:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत दररोज ५०० किलो ड्रग्ज फस्त!

मुंबईत दररोज ५०० किलो ड्रग्ज फस्त!

Last Updated: Sep 16 2020 10:08AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा शोध सुरू असतानाच अनेक गोष्टींचा पर्दाफाश होत आहे. दरम्यान, या प्रकरणात रिया चक्रवर्तीची कसून चौकशी केली असता चौकशीत रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागवल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर ड्रग्ज सेवनसंदर्भात अन्य खुलासे केले.

वाचा: एनसीबीकडून आणखी दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक

दरम्यान, नार्कोटिक्स विभागाचे वरिष्ठ निरिक्षक सुहास गोखले यांनी मुंबईच्या नशेसंदर्भात मोठा खुलासा केला. सुहास गोखले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईत दररोज ५०० किलो ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा दावा केला. रिया चक्रवर्तीच्या कबुलीनंतर नवनवीन गोष्ट समोर येत आहे.

वाचा: गेल्या चार वर्षात चीनी कंपन्या भारतात मालामाल! बाजारपेठेत तब्बल १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत. रिया चक्रवर्तीने अभिनेत्री सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग आणि सिमोन यांची नावे घेतली आहेत. 

 "