Tue, Sep 22, 2020 09:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कसारा घाटात विचित्र अपघात ३ गंभीर जखमी

कसारा घाटात विचित्र अपघात ३ गंभीर जखमी

Last Updated: Jul 05 2020 8:03PM
कसारा : पुढारी वृत्तसेवा 

शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कसारा घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सुरू असतानाच आज (दि.५) संध्याकाळी घाटात विचित्र अपघात झाला. घाटात झालेल्या अपघातात ३ गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य, कसारा पोलिस, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत जखमींना खर्डी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

रायगड : रोह्यात कोरोना थैमान सुरूच

याबाबत मिलालेली माहिती अशी की, आज कसारा घाटात ४.४५ वाजता नाशिक वाहिनीवर कंटेनर नादुरूस्त असल्याने उभा होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणारा कंटेनर नादुरूस्त असलेल्या कंटेनरवर धडकला. हा अपघात चालकाचा ताबा सुटल्याने झाला. यात एक मेकॅनिकसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. सभरसिंग राठी, मोहमद इर्शाद असे जखमी झालेल्या इसमांची नावे असून एकाचे नाव अद्यापही कळू शकलेले नाही. 

'राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय'

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य, कसारा पोलिस, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्यांनी काही वाहन चालकांच्या मदतीने अडकलेल्या चालकास बाहेर काढले. तसेच सर्व जखमींना नॅशनल हायवेच्या रूग्णवाहिकेने खर्डी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.

 "