राज्य अर्थसंकल्प ः ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प पूर्णपणे फसवा; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

Last Updated: Mar 08 2021 3:46PM
Responsive image
मुंबई ः पुढारी ऑनलाईन 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, "या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची, तरुणांची आणि सामान्यांची पूर्ण निराशा झाली आहे. ठाकरे सरकारचा हा अर्थसंकल्प फसवा अर्थसंकल्प आहे. मूळात हा अर्थसंकल्प राज्याचा अर्थसंकल्प होता की, मुंबई मनपाचा अर्थसंकल्प होता", असा सवास फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

वाचा ः जीर्ण शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटी!

फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की, "या अर्थसंकल्पापासून पूर्ण निराशा झालेली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कोणताही निधी देण्यात आला नाही. ४५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. ठाकरे सरकारची ही कर्जमाफी फसवी कर्जमाफी ठरलेली आहे. विजबिलासंदर्भात फसवी घोषणा केली आहे", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वाचा ः वैद्यकीय शिक्षण विभागास १५१७ कोटी देणार: अजित पवार

इंधन दरवाढी संदर्भात राज्य सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, "राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेलवर २७ घेण्यात येतात, त्यातील एक पैसाही सरकारने कमी केला नाही. त्यामुळे इंधन दरवाढीवरून केंद्रावर टीका करण्याचा अधिकार उरला नाही. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची, सामन्यांची, तरुणांची निराशा या अर्थसंकल्पातून झालेली आहे", अशी टीकादेखील फडणवीस यांनी केला आहे.