Sun, Sep 20, 2020 06:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी!

सायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी!

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:43AM

बुकमार्क करा

ऐरोली : वार्ताहर 

सायन-पनेवल महामार्गावर सोमवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाली. पनवेल डेपोपासून खारघरपर्यंत अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी तब्बल एक तास वेळ लागत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईसह उपनगरांतील असंख्य नागरिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग तसेच मुंबई-गोवा मार्गावरून बाहेर पर्यटनस्थळांसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिक गावी गेले होते. मंगळवारी कामकाजाचा दिवस असल्यामुळे सोमवारी सायंकाळपासूनच बाहेरगावी गेलेल्या नागरिकांनी मुंबईची वाट धरली. त्यामुळे सायंकाळी सहा वाजल्यांनतर सायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. सायन-पनेवल टोल नाक्यापासून कळंबोली सर्कलपर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. खादा कॉलनी ते कळंबोली सर्कलपर्यंत रस्त्याच्या रुदींकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली. मुंबई-गोवा महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्ग तसेच उरणकडून येणारी वाहने ही पळस्पे फाट्यावर एकत्र आल्याने वाहतूक कोंडी वाढली. पनवेलपासून पळस्पे फाट्यापर्यंत रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरदेखील वाहतूक कोंडी झाली.