Mon, Aug 10, 2020 04:30



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या सुषमा लोणे ठाणे झेडपीच्या अध्यक्ष (video)

शिवसेनेच्या सुषमा लोणे ठाणे झेडपीच्या अध्यक्ष (video)

Last Updated: Jul 15 2020 5:41PM




ठाणे  : पुढारी वृत्तसेवा

कोरोना पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा सुभाष पवार यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.  

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले.  ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.  

नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर  निवडुन आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.