Tue, Jun 15, 2021 12:39
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक! (video)

Last Updated: Jun 10 2021 12:57PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना आणि आपण एकत्र येऊ असं वाटलं नव्हत, पण आज एकत्र आहोत. शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही, पण महाराष्ट्रही शिवसेनेला अनेक वर्षांपासून पाहत आहे. माझा अनुभव विश्वासाचा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचं कौतुक केलं. 

अधिक वाचा : मला महाराष्ट्राची आणि राष्ट्रवादीच्या भवितव्याची चिंता वाटत नाही : शरद पवार (video)

यावेळी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा तसेच पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाविकास आघाडी सरकारला जनतेनं स्वीकारल आहे. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.

अधिक वाचा : पावसाळ्यात मुंबईची 'तुंबई' का होते?

शरद पवार बोलताना पुढे म्हणाले की, जनता पक्षाचं सरकार आल्यानंतरच्या कालखंडात सर्वच ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली. फक्त एवढ न करता इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत दिला नाही. एका पक्षाचा नेता असा निर्णय घेतो, पण त्याची चिंता बाळासाहेबांनी कधीच केली नाही. 

अधिक वाचा : नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन