मुंबई : पुढारी ऑनलाईन
'होणार सून मी या घरची' मालिकेतील श्री अर्थातच शशांक केतकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये शशांक बाळाकडे पाहून हसताना दिसत आहे. या फोटोवर त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ऋग्वेद शशांक केतकर.
शशांकला पूत्ररत्न झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बाळाचे नावदेखील जाहीर केले आहे. ऋग्वेद असे त्याने आपल्या बाळाचे नाव ठेवले आहे.
काही दिवसांपूर्वी शशांक केतकरने पत्नीसोबत एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती प्रेग्नेंट असल्याचं दिसत होती. २१ फेब्रुवारीला शशांकच्या घरात ज्युनिअर 'श्री'चे आगमन झाले आहे. शशांकच्या या पोस्टवर कमेंट्स येत असून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
शशांक केतकर आगामी मालिका 'पाहिले न मी तुला' त्याच्या नव्या मालिकाच्या चित्रीकरणात बिझी आहे.