Wed, Sep 23, 2020 08:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई शेअर बाजारात घसरण

मुंबई शेअर बाजारात घसरण

Last Updated: Aug 12 2020 8:59PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई शेअर बाजार निर्देशांक आज ३७ अंकांची किरकोळ घसरण नोंदवत ३८ हजार ३७० अंकांवर बंद झाला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लघु उद्योग क्षेत्राची निराशाजनक कामगिरी याचे नकारात्मक पडसाद आज बाजारात उमटल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज १४ अंकांनी घसरून ११ हजार ३०८ अंकांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया आज ५ पैशानी कमकुवत झाला आणि त्याचं मूल्य ७४ रुपये ८३ पैसे प्रति डॉलर इतकं झालं. 

 "