Tue, Aug 04, 2020 14:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाजारात तेजीमय वातावरण! सेन्सेक्सची उसळी

बाजारात तेजीमय वातावरण! सेन्सेक्सची उसळी

Last Updated: Jul 09 2020 9:34PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

गुरुवारच्या सत्रात पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांवर तेजीचा प्रभाव निर्माण झालेला दिसला. बुधवारची घसरण थांबून हे चित्र दिसले. मुंबई शेअर निर्देशांकात ४०९ अंश तर निफ्टीमध्ये १०८ अंशांची उत्तम वाढ या सत्रात झाली.

अधिक वाचा : भारतीय रेल्वेने तयार केले बॅटरीवर चालणारे इंजिन!

मुंबई शेअर बाजाराचा ३० प्रमुख कंपन्यांवर आधारलेला मुंबई शेअर निर्देशांक या सत्रात ३६ हजार ४५०.६९ अंश पातळीवर खुला झाला. त्याने या सत्रात ३६ हजार ८०६.३० अंशांची उच्चांकी पातळी नोंदवली तर त्यानेच ३६ हजार ४२२.३० अंशांची निचांकीही या सत्रात नोंदवली. 

अधिक वाचा : उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे सापडला मध्य प्रदेशात पण...

दिवसअखेरीस निर्देशांकात ४०८.६८ अंशांची सुधारणा होऊन तो अखेरीस ३६ हजार ७३७.६९ अंश पातळीवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० कंपन्यांवर आधारलेला निफ्टीही १० हजार ७५५.५५ अंश पातळीवर खुला झाला. त्याने १० हजार ८३६.८५ अंशांची उच्चांकी तर १० हजार ७३३ अंशांची निचांकी पातळी नोंदवली. दिवसअखेरीस त्यात १०७.७० अंशांची वाढ  होऊन तो १० हजार ८१३.४५ अंश पातळीवर बंद झालेला होता.

अधिक वाचा : 'पीएम श्रमयोगी मानधन' योजनेचे अल्पावधीत लाखो लाभार्थी; जाणून घ्या कसा लाभ घेता येईल