Thu, Jun 04, 2020 06:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला

आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ‘बाजार’ कोसळला

Last Updated: Apr 01 2020 7:16PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

नवीन आर्थिक वर्षाचा म्हणजे दि. १ एप्रिलचा प्रारंभ भारतीय शेअर बाजारांवर खूपच प्रतिकूल व नकारात्मक वातावरणात झाला. या सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकात मोठी घसरण नोंदवली गेली. जगभरातील आर्थिक मंदी, कोरोना व्हायरसचे थैमान याचा खूप प्रतिकूल परिणाम भारतीय शेअर बाजारांवर झालेला होता. या सत्रात प्रामुख्याने कोटक महिंद्र बँक व टेक महिंद्र यांच्यात जोरदार घसरण झाली. या सत्रात अनेक बँका व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची भाव पातळी लक्षणीयरीत्या खाली गेलेली होती.

मुंबई शेअर निर्देशांक २९ हजार ५०५.३३ अंश पातळीवर खुला झाला. त्याने २९ हजार ५०५.३३ अंशांची उच्चांकी पातळी व २८ हजार ७३.४३ अंशांची निचांकी पातळीही नोंदवली. मात्र, बाजार बंद होताना कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात १२०३.१८ अंशांची जोरदार घसरण होऊन तो २८ हजार २६५.३१ अंश पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील निफ्टीमध्ये ३४३.९५  अंशांची घट होऊन तो ८ हजार २५३.८० अंश पातळीवर बंद झाला.