Fri, Sep 25, 2020 15:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फडणवीस यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचे प्रत्युत्तर

फडणवीस यांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Last Updated: Dec 14 2019 11:56AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

शिवसेना बरोबर येत असल्यास आजही भाजपचे दरवाजे खुले आहेत, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता.१४) एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. पंरतु, त्यांच्या या विधानाचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीतून सडेतोड उत्तर दिले आहे. आता कुणीही कोणासाठी दरवाजे उघडे ठेवू नयेत असे सांगत फडणवीसांना खडसावले. 

संजय राऊतांनी ''आता कुणीही कोणासाठी दरवाजे उघडे ठेवू नयेत, जेव्हा दरवाजे उघडायचे होते तेव्हा दरवाजे उघडले नाहीत' असा आरोप करत चर्चा करण्याची वेळ निघून गेल्याचे सांगत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. 

तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेले हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. असे म्हणत महाविकासआघाडी सरकारची खिल्ली उडवली होती. फडणवीसांच्या उत्तरालाही राऊतांनी चांगलीच चपराक लगावली. आमचे सरकार हे ऑटो किंवा बैलगाडी असो आम्ही  कासवाच्या गतीने जावू, पण शंभरी पार करू असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला. 

यापूर्वीही भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीची सत्तास्थापन झाली असली तरी भाजप शिवसेना यांची युती पुन्हा होईल अशी आशा व्यक्त केली होती. परंतु संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यामुळे पाटील यांच्या आशेवर पाणी फेरले. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 "