Tue, Aug 04, 2020 14:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'तुम्ही सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', यावर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

'तुम्ही सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', यावर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

Last Updated: Jul 11 2020 10:33AM

शरद पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा पहिला अंक आज प्रसिध्द झाला. यामध्ये कोरोना काळातील राजकारण कसे बदलले, लॉकडाऊनमधील स्थिती याबद्दल चर्चा करण्यात आली. संजय राऊत यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी आणि कोरोना काळातील परिस्थिती याबद्दल चर्चा केली. संजय राऊत यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

यावेळी 'शरद पवार सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?' असा प्रश्न संजय राऊत यांनी पवारांना विचारला. यावर शरद पवार यांनी 'दोन्हीही नाही' असे उत्तर दिले. रिमोटने किंवा कंट्रोलने प्रशासन चालत नाही, असे परखड उत्तर पवारांनी दिले. शरद पवार हे सरकारचे हेडमास्तर किंवा रिमोट कंट्रोल आहेत, अशी टिका विरोधकांकडून व्हायची.

पवार यांनी आपण हेडमास्तर किंवा रिमोट कंट्रोल दोन्ही नसल्याचे स्पष्ट केले. सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज्याच्या एकूणच परिस्थितीबाबत संजय राऊत यांनी शरद पवारांशी संवाद साधला.

सरकारचे हेडमास्तर की रिमोर्ट कंट्रोलर यावर शरद पवार म्हणाले, हेडमास्तर शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार रिमोटने कधी चालत नाही. जेथे लोकशाही नाही तेथे रिमोट चालतो. लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलने कधी चालू शकत नाही. मला ते मान्य नाही

लॉकडाऊनच्या काळात बाळासाहेबांची आठवण झाली का? 

लॉकडाऊनच्या काळात बाळासाहेबांची आठवण झाली का? असा प्रश्न मुलाखतीत संजय राऊत यांनी विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी स्मितहास्य केलं. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे उत्तमपणे काम करत. त्यांची एक आठवण आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. पण, मुख्यमंत्री म्हणून ठाकरे उत्तम काम करीत आहेत, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. 

कोरोनासोबत जगावं लागेल : शरद पवार 

मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करायला हवी. कोरोना सोबत घेऊन जगावं लागेल असे म्हणत महाराष्ट्र या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

वाचा - मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवला