Sat, Sep 19, 2020 08:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग

Last Updated: Aug 12 2020 12:34AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. त्याचा कर्करोग तिसरा टप्प्यातला असल्याचे समजते असून तो लवकरच अमेरिकेत उपचारांसाठी रवाना होणार असल्याची माहीती मिळत आहे. अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने संजय दत्तच्या प्रकृतीसंदर्भात ट्विट केले आहे. 

त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे सांगितले आहे.काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची करोना चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. उपचारांनतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.

मात्र त्यानंतर संजय दत्त याने कामातून ब्रेक  घेत असून उपचारांसाठी मी हा ब्रेक घेत आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवू नका. तुमचे प्रेम आणि शुभेछा असुद्या मी लवकरच परत येईन. असे ट्विट केले आहे

 "