Sun, Oct 25, 2020 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलमान खुर्शीद आणि प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

सलमान खुर्शीद आणि प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

Last Updated: Sep 25 2020 1:37AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

चालू वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी डिस्क्लोजर स्टेटमेंट दाखल केले असून आरोपींमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि वादग्रस्त वकील प्रशांत भूषण यांचा समावेश केला आहे. दंगल प्रकरणात आतापर्यंत अनेक राजकारणी, वकील, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील लोकांना पोलिसांनी आरोपी केलेले आहे. 

सीएएचा विरोध करत दिल्लीत चालू वर्षाच्या सुरुवातीला धिंगाणा घालण्यात आला होता. दंगलीत पन्नासपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. दंगलखोरांना चिथावणी देण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर अनेक लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या डिस्क्लोजर स्टेटमेंटमध्ये सलमान खुर्शीद, प्रशांत भूषण यांच्याशिवाय काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहाँ तसेच खालिद सैफी यांचा समावेश आहे. 

दिल्ली दंगल प्रकरणी १६  सप्टेंबर रोजी पोलिसांनी हजारो पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. भारतीय दंड संहिता, यूएपीए, आर्म्स ऍक्ट, प्रिवेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी आदी कायद्याखाली आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. आरोपींच्या वकिलांना गेल्या सोमवारी आरोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या होत्या.

 "