Wed, Sep 23, 2020 01:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर एसपी विनय तिवारींची क्वारंटाईनमधून मुक्तता

अखेर एसपी विनय तिवारींची क्वारंटाईनमधून मुक्तता

Last Updated: Aug 07 2020 3:15PM

पाटणाचे एसपी विनय तिवारीमुंबई : पुढारी वृत्तसेवा

बिहारमधील पाटणाचे एसपी विनय तिवार यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईनमधून मुक्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. त्यावेळी ते बिहारहून मुंबईला आले होते.

सर्वोच्च न्यायालयाने विनय तिवारी यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज त्यांचे क्वारंटाईन रद्द करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार, एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करताना महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे त्यांनी पालन केले नाही म्हणूनच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे.

विनय तिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून पाटणाकडे रवाना होतील. बीएमसीने विनय तिवारी यांना मेसेजद्वारे क्वारंटाईन समाप्त करत असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर, बीएमसीनेही या आदेशाची एक प्रत बिहार पोलिस मुख्यालयात पाठविली आहे. तसेच विनय तिवारी यांना फोनवर सांगण्यात आले आहे की, संध्याकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास पाटणाला जाण्यास विमान आहे. हे विमान कनेक्टिंग आहे. तसेच ते व्हाया हैदराबादहून पाटणाला पोहोचणार आहे.
 

 "