Tue, Oct 20, 2020 12:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर (video)

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर (video)

Last Updated: Sep 21 2020 11:26AM
भिवंडी : पुढारी वृत्तसेवा 

ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे.

वाचा : पहाटे सरकार स्थापनेच्या गुप्त कटात काही अधिकारी होते सामील : शिवसेना

इमारत दुर्घटनेनंतर तातडीने ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असे भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये मृत्यू  झालेल्यांच्या  वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे
१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे :

१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

वाचा : राजीव सातव यांच्यासह राज्यसभेतील ८ खासदार निलंबित

 "