Sun, Aug 09, 2020 01:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तीन वर्षांत 7 लाख घरांचा संकल्प करा : राज्यपाल 

तीन वर्षांत 7 लाख घरांचा संकल्प करा : राज्यपाल 

Last Updated: Nov 21 2019 2:02AM
मुंबई : प्रतिनिधी  

पंतप्रधान गृहनिर्माण ग्रामीण योजनच्या उद्दीष्टयपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी चांगले काम केले आहे.येत्या तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दीष्टय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

गृहनिर्माण दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते. पंतप्रधान ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी उत्त्कृष्ट कार्य केलेल्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी, सरपंच,लाभार्थी अशांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच राज्य व्यवस्थापन कक्षातील उपव्यवस्थापक मंजिरी टकले यांचा व त्यांच्या सहकार्‍यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच राज्य व्यवस्थापन कक्षाच्या वतीने ग्रामविकास विभागाचा उत्कृष्ट कामासाठी गौरव करण्यात आला. राज्यात गेल्या तीन वर्षात 4.50 लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 3.66 लाख घरे बांधण्यात आली असून आदिवासी विभागामार्फत विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली आहे.

घर निर्मितीसाठी जमिनीची उपलब्धता करून देण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांनी सहकार्य करावे तसेच घर बांधण्यासाठी वित्त सहाय्य बँकानी करावे असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले.