राज्यात रेकॉर्डब्रेक कोरोनामुक्त!

Last Updated: Sep 22 2020 1:28AM
Responsive image


मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी राज्यात 15 हजार 738 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णसंख्येची विक्रमी नोंद झाली असून 32 हजार 7 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 16 हजार 348 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.84 टक्के इतके नोंदविले गेले आहेत. तसेच बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले.राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन ती 2 लाख 74 हजार 623 वर आली आहे.

मुंबईत सोमवारी कोरोनाच्या 1837 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 86 हजार 150 झाला आहे. 36 जणांचा मृत्यू झाला असून 2728 जण बरे झाले. मृतांमध्ये 22 पुरुष, 14 महिलांचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसून सोमवारी 1 हजार 568 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दुर्दैवाने रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी होत नसून गेल्या चोवीस तासांत 29 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत चार हजार 172 रुग्ण दगावले असून 1 लाख 60 हजार 271 कोरोनाग्रस्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख 37 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 18 हजार 598 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 
 

जॅकलिन फर्नांडिसकडून तीन topless फोटो शेअर करत चाहत्यांना 'स्पेशल' संदेश!


'तर भाजपकडून सांगितले जाईल लस टोचण्यासाठी आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!'


'तर भाजपकडून सांगितले जाईल लस टोचण्यासाठी आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!'


होम क्वारंटाईन असलेल्या अजित पवार आणि नाथाभाऊंची 'अशी' झाली भेट!


केकाटणाऱ्या रिपब्लिक टीव्हीसह अर्णव गोस्वामींना दणक्यावर दणके सुरुच!


भाजपला सलग दुसऱ्या दिवशी भगदाड! सहयोगी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार


'चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातून आमदार सोडा पंचायत समिती सदस्य तरी निवडून आणता येईल का?'


गौतम पाषाणकरांची सुसाईड नोट मिळाली


पीककर्ज देताना जुन्या कर्जाचे व्याज घेतले असेल तर परत करा


काश्मीरचा झेंडा परत मिळेपर्यंत कोणत्याही झेंड्याला सलाम नाही