Tue, Jul 07, 2020 16:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना : उद्धव- राज यांची फोनाफोनी!

कोरोना : उद्धव- राज यांची फोनाफोनी!

Last Updated: Mar 23 2020 2:26PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध निर्णय घेत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या कामाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर राज यांनी यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत माझं बोलणं झालं असल्याचीही माहिती दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिल्यांदाच फोनाफोनी झाली आहे. 

राज ठाकरे यांनी आज (दि.२३) पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत असलेल्या उपायोजनांवर आपले मत व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे योग्य पावले उचलत आहेत, अशा शब्दांत कौतुक करत यासंदर्भात काल माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी,  अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याचेही राज यांनी यावेळी सांगितले.