Wed, May 12, 2021 02:20
राधिका आपटेने सांगितला कोरोना काळातील शूटिंगचा अनुभव 

Last Updated: May 04 2021 1:57PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

इंडीस्टार राधिका आपटेने नुकतीच 'मिसेस अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाऊन होण्यापूर्वी या अभिनेत्रीने कोलकातामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. तिने या कोरोना काळातील आपले शूटिंगचे अनुभव शेअर केले आहेत.  

राधिकाने स्वत: याविषयीचा खुलासा केला, ती म्हणाली, "आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते."

वाचा - आवाज उठवायला अनेक व्यासपीठे उपलब्ध; ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड केल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून शूटिंगशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.

'ओके कॉम्प्यूटर' या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाबद्दल कौतुक झाल्यानंतर राधिका, भविष्यात लवकरच काही प्रमुख चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि काही अघोषित चित्रपटांचा समावेश आहे.