मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहरावर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू आहे.
अशातच मुंबईतील मोठ्या बाजारपेठा, मार्केट, मॉल्स आणि मंदिरे अशी गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांकडून टार्गेट केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोलवर चालणारी छोटी विमाने, मिसाईल अशा हवाई उपकरणांच्या माध्यमांचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.