होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्यावसायिक आणि खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी

व्यावसायिक आणि खासगी आस्थापना सुरू होणार

Last Updated: Apr 18 2020 10:21AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

कोरोनाविरुद्धची लढाई लढत असतानाच राज्य शासनाने आर्थिक स्तरावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. काही छोटे-मोठे उद्योगधंदे येत्या २० तारखेपासून सुरू करण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन-तीन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे सुरू झाले असून आतापर्यंत विभागात १ हजार ३६५ उद्योग सुरू झाले आहेत. यासोबतच शासनाने काही खासगी व्यवसायांना अटींसोबत परवानगी देण्यात आल्या आहेत. 

तर खालील व्यावसायिक आणि खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी -

• ब्रॉडकास्टिंग,डीटूएच आणि केबल सेवा देणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमे

• 50 टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटी संबंधित सेवा

• कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स

• ग्रामपंचायत स्तरावरील शासन मान्यता प्राप्त सामान्य सेवा केंद्र 

• ई-कॉमर्स कंपन्या. ई-कॉमर्स कंपन्यांच्या वाहनांना दळणवळणासाठी अत्यावश्यक सेवेची परवानगी असणे आवश्यक. यांना फळे वैद्यकीय साहित्य इत्यादींची डिलीव्हरी 

• कुरिअर सेवा, (लॉजिस्टीक) संबंधित बंदरे, विमानतळे, रेल्वे स्टेशन, कंटेनर डेपो, इतर खासगी युनिटस आदी ठिकाणांवरील कोल्ड स्टोरेज, गोडाऊन सेवा संबंधित सेवा.

• खासगी सुरक्षा सेवा आणि कार्यालये किंवा वसाहतींमधील इमारतींच्या देखभालीसाठी सहाय्यभूत ठरणार्‍या व्यवस्थापन सुविधा सेवा

• लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक किंवा नागरिकांची राहण्याची व्यवस्था करणारी हॉटेल्स,लॉज किंवा होमस्टे,वैद्यकीयआणि अत्यावश्यक सेवांमधील,विमान किंवा जलवाहतुकीतील कर्मचारी

• क्वारंटाईनकाळात जाणार्‍या महत्वाच्या संस्था किंवा सेवा.

• रेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल डिलीव्हरी किंवा टेक-अवे सेवा. डिलीव्हरी देणार्‍याने चेहऱ्यावर मास्क लावावा आणि आपल्या हातांवर सतत सॅनिटायझर लावावे

• किचनमध्ये काम करणारा स्टाफ किंवा डिलीव्हरी देणार्‍यांची नियमित आरोग्य तपासणी किंवा स्क्रिनिंगची व्यवस्था

• नेटवर्क संबंधित सर्व घाऊक परिचालन आणि वितरण सेवा

• फरसाण किंवा तत्सम पदार्थांची आणि मिठाईची दुकाने (जिथे आत बसून खाण्यास परवानगी नाही)

• ऊर्जेचे वितरण,निर्मिती आणि पारेषणासाठीआवश्यक इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर्स,जनरेशन कंपनींची दुरुस्तीची दुकाने किंवा वर्कशॉप्स

• जीवनावश्यक वस्तु, औषधे, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल व आधारित उत्पादन करणारे उद्योग

• सर्व प्रकारचे कृषी, फलोत्पादन व कृषी प्रक्रीया, पॅकेजिंग आणि वाहतुक उद्योग

• उत्पादन एकक, ज्यात प्रक्रीया सातत्याची आवश्यकता आहे आणि पुरवठा साखळीतील उद्योग

• आय टी हार्डवेअर उत्पादन

• कोळसा उद्योग, खाण आणि खणीज उद्योग,(सुक्ष्म खणीजांसह), त्याची वाहतुक. खाणींसाठी आवश्यक असलेल्या विस्फोटकांचा पुरवठा

• पॅकेजिंग उद्योग

• ऑईल आणि गॅस एक्स्प्लोरेशन / रिफायनरी

• ग्रामिण भागातील विट भट्ट्या

• गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्य तेलाशी संबधीत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग