Fri, Oct 30, 2020 19:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › Paytmला google कडून सकाळी दणका, सायंकाळी दिलासा!

Paytmला google कडून सकाळी दणका, सायंकाळी दिलासा!

Last Updated: Sep 19 2020 1:37AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गुगल प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवरुन वरून ऑनलाइन व्यवहारांसाठी लोकप्रिय मोबाईल पेमेंट ॲप 'पेटीएम' हटवण्यात आले. ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अॅपला परवानगी देत नाही, अशी स्पष्टोक्ती गुगल कडून देण्यात आली. यानंतर खडबडून जागे झालेल्या पेटीएमने आपण गुगल प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवर आल्याची माहिती दिली. आम्ही परत आलो आहोत, असे ट्विट पेटीएमकडून करण्यात आले. 

ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अॅपला परवानगी देत नाही, अशी स्पष्टोक्ती गुगल कडून देण्यात आली आहे. तर, युझर्सला काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. लवकरच या प्लॅटफॉर्मवर परत येऊ, असा विश्वास कारवाई नंतर पेटीएम कडून ट्विटरवरून व्यक्त करण्यात आला आहे. 

पेटीएम या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्याची परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवली जाते. हे सर्व गुगलच्या नियमांमध्ये बसणारे नाही असे, सांगत गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे. स्मार्ट फोन यूझर्सला आता हे अॅप गुगल प्ले स्टोअर वरुन आता डाउनलोड करता येणार नाही. पंरतू, प्ले स्टोअर वर पेटीएम सर्च केल्यास कंपनीचे इतर अॅप्स  पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल अजूनही उपस्थित आहेत. यासोबतच अॅपल अॅप स्टोअर मध्ये ही पेटीएम अॅप उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. 

कारवाईसंबंधी गुगलकडून स्पष्टीकरण 

नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे नियमांच्या विरोधात आहे, असे स्पष्टोक्ती गुगल कडून देण्यात आले आहे. 

युझर्सचे संरक्षण सर्वोतपरी 

ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा गोष्टींपासून युझर्सचे संरक्षण करणाचा प्रयत्न आहे. एखाद्या अॅपने याचे उल्लंघन केल्यास त्यासंदर्भातील नियमांची माहिती अॅपच्या डेव्हलपर्सला दिली जाते. यासंदर्भातील इतर कायदेशीर माहिती आणि नियम अॅप निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सांगितली जाते. पंरतू, अनेकदा सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अॅपवर कारवाई केली जाते, असे गुगल कडून सांगण्यात आले आहे. 

 "